Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, June 7, 2017

चक्क बकरीने 66 हजार रुपये गिळले



किन्नोज गावात एका  बकरीला इतकी भूक लागली होती की तिने मालकाच्या पँटमधील नोटांचं बंडल बाहेर काढलं, आणि चरण्यास सुरुवात केली. बकरीने चक्क 66 हजार रुपये गिळून टाकले. शेतकरी असलेल्या सर्व्हेश कुमार यांनी आपल्या खिशात 66 हजार रुपये ठेवले होते. यामध्ये सगळ्या दोन हजाराच्या नोटा होत्या. सर्व्हेश कुमार यांच्या घराचं बांधकाम सुरु असून विटा खरेदी करण्यासाठी त्यांनी है पैसे जमा केले होते. सर्व्हेश कुमार यांनी बकरी नोटा चरत असल्याचं दिसलं तेव्हा त्यांचा काही वेळ आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्यासाठी तो एक आश्चर्याचा धक्काच होता. त्यांनी बकरीच्या दिशेने धाव घेत आपले पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती फक्त दोनच नोटा उरल्या होत्या. बकरीने उरलेल्या 31 नोटा कधीच फस्त केल्या होत्या. 

No comments:

Post a Comment