मुंबई, दि. 6 - कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. ... लग्न कसं ठरवायचं यामध्ये बदल झालेत, पण लग्नसोहळा पारंपरिक हवा म्हणणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी आहे. लग्न म्हणजे प्रत्येकाला देवानं दिलेलं अमूल्य बक्षीस. लग्न म्हणजे सुंदर स्वप्न अशा प्रकराच्या काव्यत्मक पंक्ती कितीतर आहेत. भारतीय लग्न पद्धती बदलली असली तरी त्यातील देखावा कमी झालेला नाही. भारतीय लग्न म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ? लग्नघर, रोषणाई, नाचणारे वऱ्हाडी आणि वाजंत्री, सुग्रास जेवण डोळ्यासमोर येतं. पण या लग्नांचे प्रमुख आकर्षण असतं ते लाजरी -बुजरी, नटलेली आणि हळदीच्या रंगात रंगलेली नवरी. नवरीचा पोशाख नेहमीच चर्चेत असतो. तिनं काय घातलंय याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण अशीच नवरी जर शॉर्टस् घालून आली तर?
हा पराक्रम केलाय एका पंजाबी नवरीने. ही नवरी छान नटलीय. घुंघटही तिनं घेतलाय. पण लेहेंगा घालण्याचं सोडून ही चक्क शॉर्टस घालून आली. सध्या तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचे दिसते आहे. नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नवरी- लाल चोळीने सजली होती, भरजरी दागिन्यांनी नटली होती, लग्नाला शोभेल असा मेक-अपही तिने केला होता. फक्त लेहेंग्याच्या जागी शॉर्टस घालून ती नवऱ्यासोबत हातात हात घालून चालत होती.
परंपरा आणि आधुनिकतेचे परफेक्ट कॉम्बिनेशन असणाऱ्या या नवरीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवलीय. लग्नासाठी नट्टा-पट्टा सगळ्याच नवऱ्या करतात पण शॉर्टस घालणारी ही नवरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

No comments:
Post a Comment