Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

भारताच्या चिंतेत वाढ; श्रीलंकेने चीनच्या ताब्यामध्ये दिले बंदर, 72 अब्ज रुपयांचा सौदा



कोलंबो-श्रीलंकेने आपले सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे बेट चीनच्या सरकारी कंपनीला विकण्याचा करार केला आहे. उभय देशांत सुमारे ७२ अब्ज रुपयांचा (१.१२ अब्ज डॉलर) त्यासाठी करार झाला आहे. करारानुसार श्रीलंकेने हंबनटोटा बंदराची ७० टक्के भागीदारी चीनच्या एका फर्मला विकली आहे.

सौद्यात बंदराच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ श्रीलंकेच्या नौदलास देण्यात आली आहे. मात्र चीनच्या नौदलाद्वारे त्याचा वापर होण्याची शक्यता असल्याने भारताच्या चिंतेत वाढ झाली होती. अनेक महिन्यांपासून त्यामुळेच हा सौदा अडकून पडला होता. कारण चिनी नौदलाच्या उपस्थितीवर भारताने आक्षेप घेतला होता. श्रीलंकेच्या बंदरे विकास मंत्री महिंदा समरसिंघे म्हणाले, कोणत्याही परदेशी नौदलास येथे तळ बनवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. सौद्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सामरिक चिंतेला लक्षात घेऊन त्यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जाते. भारत या सौद्याकडे राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणून पाहते. भारताच्या दक्षिणेकडील प्रदेश श्रीलंकेशी जोडलेला आहे.

सहा महिन्यांपूर्वीच आराखडा :श्रीलंका चीन यांच्यातील या सौद्याचा आराखडा सहा महिन्यांपूर्वीच तयार झाला होता. परंतु श्रीलंकेत सौद्याबद्दल अंतर्गत पातळीवर सहमती झालेली नव्हती. या सौद्यामुळे सरकार टीकेचे धनी बनले होते. एवढेच नव्हे तर श्रीलंकेत सर्वत्र निदर्शनेही होत होती. मोठ्या विरोधानंतरही मंगळवारी श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

No comments:

Post a Comment