नवी दिल्ली, दि. 17 - भारताचे भावी राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. 776 खासदार आणि 4120 आमदार मतदानाव्दारे देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीची निवड करतील. राम नाथ कोविंद की, मीरा कुमार यांचा निर्णय लवकरच होईल. सकाळी 10 वाजल्यापासून संसदेसह विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान सुरु आहे.
राम नाथ कोविंद 70 टक्क्याच्या मताधिक्क्यासह विजयी होतील असा अंदाज आहे. या निवडणुकीत अमुक एका उमेदवारालाच मतदान करा म्हणून राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येत नाही. त्यामुळे क्रॉस वोटिंगचीही शक्यता नाकारता येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सकाळी 10 वाजता संसदेत मतदान केले. मतदान करण्याआधी मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी पावसाळी अधिवेशन अपेक्षा घेऊन आले आहे. या अधिवेशनाने देशाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडण्याची संधी दिली आहे.
विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आमदार-खासदारांना अंत:करणाचा आवाज ऐकून भारताच्या हिताचा निर्णय घेण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment