Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 28, 2017

डोभाल यांची चिनी पदस्थांशी चर्चा, फॉक्सकॉनमध्ये 10 अब्ज डॉलर्सच्‍या गुंतवणुकीवर सहमती

बीजिंग-सिक्कीम सीमेविषयीचा तिढा कायम असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चिनी समपदस्थ यांग जिएची यांच्याशी चर्चा केली आहे. ब्रिक्स बैठकीदरम्यान दोघांनी स्वतंत्र चर्चा केली. द्विपक्षीय संबंधाविषयी ही बैठक होती. या चर्चेला डोकलाम सीमावादावर तोडगा निघण्याच्या संदर्भात महत्त्वाचे मानले जात आहे. सैन्यांमदरम्यान महिन्यापेक्षा अधिक अवधीपासून तणाव आहे. डोभाल आणि जिएची भारत-चीन सीमा प्रकरणांचे प्रतिनिधी आहेत. डोभाल जिनपिंग यांच्याशीही चर्चा करतील.

चिनी माध्यमांचा सूर बदलला, मोदींची प्रशंसा केली
चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील धोरणांची प्रशंसा केली आहे. खुले आर्थिक धोरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. डोकलामविषयी तेढ कायम असताना सिन्हुआच्या वृृत्तात म्हटले आहे की, गुंतवणुकीला आकर्षित करण्यात भारताला यश येत आहे. गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार केले आहे. गेल्या २ वर्षांत भारत परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी झाला.

चीनचा प्रस्ताव अमान्य : बागले
भारताने चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या भूमिकेला अमान्य केले आहे. उभय देशांतील चर्चेसाठी डोकलाम येथून भारतीय सैन्याला माघारी घ्या, अशी अट चीनने टाकली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेलीच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटेल आहे की, भारताने डोकलाम मुद्द्यावरील आपली भूमिका आणि तोडग्याची पद्धत स्पष्ट केली आहे. याद्वारेच शांततापूर्ण तोडगा निघू शकेल.

No comments:

Post a Comment