इंटरनॅशनल डेस्क- इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबैदी यांनी नुकतीच घोषणा केली, लष्कराने इसिसच्या ताब्यातून मोसुल शहर हिसकावून घेतले आहे. मोसुल हे शहर इराकमधील सर्वात महत्त्वाचे शहर मानले जाते. यावर 2014 पासून इसिसचा ताबा होता. या दरम्यान सुमारे 9 लाख लोक शहर सोडून गेले. त्यामुळे हे शहर ओसाड पडले आहेत. मोसुलशिवाय इराकमधील अशी चार-पाच शहरे आहेत जेथे इसिसने जबरदस्त हिंसा केली. अनेकांच्या हत्या केल्या. त्यामुळे लाखो लोक जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेले. कधी 24 तास सुरु राहणारी ही शहरे ओलाड पडल्याने सध्या भू करताहेत.
काराकस-
मोसुलपासून 60 किमी दूर असलेले काराकस शहरावर इसिसने वर्ष 2014 मध्ये ताब्यात घेतले. इराकमधील या शहरात सर्वात जास्त ख्रिश्चन लोक राहतात. सुमारे 2 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात 50 हजार लोक ख्रिश्चन आहेत. त्यामुळे इसिसने जेथे जबरदस्त हिंसा केली. ज्यात हजारों लोकांना मारले गेले. उर्वरित लोक पळून गेले. 2016 मध्ये आर्मीने इसिसकडून शहर ताब्यात घेतले. आता हे शहर ओसाड पडले आहे.
रमादी-
सुमारे साडे पाच लाख लोकसंख्या असलेले हे शहर इसिसने 2015 मध्ये आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, वर्षभरातच इराकी सेना व अमेरिकेने ताब्यात घेतले. मात्र, वर्षभर झालेल्या लढाईत अमेरिका व इराकी सेनेने रमादी शहरावर 850 वेळा बॉम्ब फोडले. त्यामुळे हे शहर उद्धवस्त झाले आहे.
तेशकोपा
मोसुलपासून फक्त 25 किमी दूर असलेले तेशकोपा इराकमधील ऐतिहासिक शहर मानले जाते. इसिसने 2014 मध्ये ते ताब्यात घेत तेथील टूरिस्ट प्लेसेज, गैर-इस्लामिक धार्मिक स्थळांची मोठी तोडफोड केली. शिवाय हजारो लोकांना मारून टाकले. ऑक्टोबर 2016 मध्ये हे शहर इराकी लष्कराने दोन महिने इसिस दहशतवाद्यांशी लढा दिल्यानंतर ताब्यात घेतले. मात्र, हे शहर आजही ओसाड पडलेले आहे.
किरकुक-
बगदादपासून सुमारे 236 किमी दूर असलेले किरकुक शहर इराकमधील तेलसाठ्याचा गड मानला जाते. आर्थिक स्त्रोतासाठी इसिसने हे शहर प्रथम ताब्यात घेतले. 2013 मध्ये इसिसने लष्कराचे 1500 सैनिकांसाठी 300 सैनिक मारताच इतर सैनिक तेथून पळून गेले. इसिसने पेट्रोलियम बिजनेस आपल्या ताब्यात घेतला व आपल्याकडे पैसा खेळता राहील याची काळजी घेतली. मात्र नंतर अमेरिकेने तेथील पाईपलाईन्स आणि रस्ते स्फोटाने उडवून दिल्यानंतर दहशतवाद्यांचा
No comments:
Post a Comment