Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, July 17, 2017

भारताच्या गोळीबारामुळे पाकिस्तानचे चार सैनिक नदीत बुडाले


इस्लामाबाद, दि. 17 - जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवासांपासून गोळीबारी सुरू आहे. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या एका वाहनावर केलेल्या गोळीबारामुळे ते वाहन नदीत बुडून चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.  
 
पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)मध्ये नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या एका वाहनावर भारतीय सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. त्यामुळे ते वाहन नदीत बुडालं, त्यामध्ये 4 सैनिक होते असं पाकिस्तानी सेनेकडून सांगण्यात आलं आहे. पीओकेच्या मुजफ्फराबादपासून 73 किलोमीटर दूर नीलम नदीजवळ असलेल्या एका वाहनावर भारतीय जवानांनी गोळीबार केला . त्यामुळे चार सैनिक नदीत बुडाले असं पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ता आसिफ गफूर यांनी म्हटलं. यापेकी एका सैनिकाचा मृतदेह शोधण्यात यश आलं असून इतर तिघांचा शोध सुरू असल्याचं वृत्त आहे. वृत्तसंस्था reuters ने याबाबत वृत्त दिलं आहे.  
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवासांपासून गोळीबारी सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी उशीरा थोड्यावेळासाठी पाकिस्तानकडून गोळीबार बंद झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला. रविवारी दिवसभरही नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. पुंछ येथील बालाकोट आणि राजौरी येथील तरकुंडी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून  गोळीबारी सुरू आहे. भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.  
 
पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद- 

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 

यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेले 

लान्स नायक मोहम्मद नासीर यांचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ पोलीस 

अधिका-याने दिली
इस्लामाबाद: हेरगिरी आणि विघातक कारवाया केल्याबद्दल पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांनी केलेल्या दयेच्या अर्जावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख न्यायबुद्धिने गुणवत्तेवर निर्णय देतील, असा दावा पाकिस्तानने रविवारी केला.
पाकिस्तानी सैन्यदलांचे प्रसिद्धी महासंचालक मेजर जनरल आसीफ गफूर यांनी रावळपिंडीत पत्रकारांना सांगितले की, जाधव यांच्याविरुद्धच्या पुराव्यांचा लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा अभ्यास करत असून ते त्यावर लवकरच निर्णय घेतील. जो निर्णय होईल तो गुणवत्तेवरच घेतला जाईल.
अपिली लष्करी न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर जाधव यांनी लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केला आहे. तोही 

फेटाळला गेला तर राष्ट्राध्यक्षांकडे दयेचा अर्ज करण्याची संधी त्यांना आहे. दरम्यान, दि हेग येथील आंतरराष्ट्रीय 

न्यायालयाने भारताच्या याचिकेवर जाधव यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली आहे. . 

No comments:

Post a Comment