कॅनबेरा-अमेरिकी प्रशांत सैन्य दलाच्या कमांडरने म्हटले आहे की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला तर ते पुढच्या आठवड्यातदेखील चीनवर अण्वस्त्र हल्ल्यास सज्ज आहेत. सैन्य आपल्या कमांडर इन चीफच्या आदेशाचे पालन करेल. अॅडमिरल स्कॉट स्विफ्ट ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय विद्यापीठाच्या संरक्षण परिषदेत बोलत होते.
ऑस्ट्रेलियाजवळ सागरी क्षेत्रात अमेरिका-ऑस्ट्रेलिया नौदल व्यापक संयुक्त युद्धाभ्यास करत होते. याच्या समारोपाच्या वेळी स्विफ्ट यांनी हे वक्तव्य केले. स्विफ्ट यांनी म्हटले की, अमेरिकी सैन्याचा प्रत्येक जवान देशी-विदेशी प्रत्येक शत्रूपासून संरक्षणासाठी अमेरिकी राज्यघटनेची शपथ घेतो. आम्ही आमचे अधिकारी आणि राष्ट्राध्यक्षांच्या आज्ञेचे पालन करतो.

No comments:
Post a Comment